जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.

आज दिनांक 11/4/23 रोजी केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना मनमाड, ओबीसी शाखेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महीला कर्मचारी वनिता शिंदे आणि छाया छत्रे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले व पेढे वाटून आनंद साजरा केल याप्रसंगी एस्सी/एसटी असोसिएशनचे झोनल सचिव सतिशभाऊ केदारे त्याच बरोबर ओबीसीचे अध्यक्ष निकमसर ,सी र एम एस चौथमल बि एम आर एस चे भोसले व माली यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला.सुत्रसंचालन. शाखा सचिव शशिकांत आढोकार यांनी केले तर शाखा कार्यअध्यक्ष संजय कातकडे खजिनदार रामदनी यादव, ओबीसीकडून दिलीप बोरसे, जितेंद्र ,आयुष, मेघनाथ,तर यांनी नियोजन केले.तर अभ्युदय बागूल,विजय काळे, झेंडे मामा, अर्जुन बागूल, यांनी विशेष सहकार्य केले.एस्सी/एसटी असोसिएशनचे सचिव प्रवीण भाऊ अहिरे तसेच कार्यकर्ते,सी आर एम एस अध्यक्ष प्रकाश बोडके, सचिव नितीन पवार व कार्यकर्ते , एन. आर एम यू चे पदाधिकारी . मनसे अध्यक्ष भास्कर सोमासे, कार्यक्रमास मोठ्या संख्येने कर्मचारी व सुपरवाझर उपस्थित होते