जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.
तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. राष्ट्रवादीसह ‘तृणमूल कॉँग्रेस’ आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ यांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्याचवेळी आम आदमी पार्टीला नव्याने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी देशातील किमान चार राज्यांमध्ये एखाद्या पक्षाच्या उमेदवारांना 6 टक्क्यांहून अधिक मते मिळणे आवश्यक आहे. तसेच लोकसभेत किमान 4 खासदारांनी त्या पक्षाचे प्रतिनिधित्व केले पाहिजे, असा नियम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (एनसीपी), तृणमूल कॉँग्रेस (टीएमसी), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) या तिन्ही पक्षांच्या कामगिरीचा आढावा अलिकडेच घेतला होता. त्यानुसार हे तिन्ही पक्ष राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी आवश्यक निकषांची पूर्तता करत नसल्याने त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा दर्जा कायम होता. मात्र, अलिकडच्या काळात महाराष्ट्राबाहेर अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय आणि नागालँड या राज्यात राष्ट्रवादीची कामगिरी सुमार राहिली आहे. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला नोटीस बजावली होती.
दिल्लीच्या राजकारणातून उदयाला आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत आपने 6.8 टक्के मते घेतली. याशिवाय 2 आमदार निवडून आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीत आपने 13 टक्के मते घेत 5 जागा जिंकल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.त्यामुळे हा पक्ष केवळ प्रादेशिक पक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. किमान चार राज्यांमध्ये पक्षाचे अस्तित्व असणे गरजेचे आहे. या सगळ्या नियमांमधून राष्ट्रवादी अपात्र ठरला आहे. केवळ राष्ट्रवादी पक्षच नाही तर आणखी काही पक्षांवर देखील ही कारवाई केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सुनील तटकरे यांनी यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. जो निर्णय आला आहे
त्याच्याविषयी अधिकृत माहिती आलेली नाही. आम्ही ज्येष्ठ विधिज्ञांकडून सल्ला घेणार आहोत. आमच्याकडे निर्णयाची प्रत आलेली नाही. पंधरा दिवसांपूर्वी आयोगानं आम्हाला आमचे म्हणणे मांडण्यासाठी मुभा दिली होती. आम्ही राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आता आयोगानं जो निर्णय घेतला आहे त्याबाबत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत असं त्यांनी म्हंटलं आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने सोमवारी संध्याकाळी याबाबतची घोषणा केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमुल काँग्रस पक्ष आता प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढला हा शरद पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
0 टिप्पण्या