स्वर्गीय, रफिक भाई शेख यांच्या स्मरनार्थ, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त, भव्य शरबत वाटप कार्यक्रम,
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.
मनमाड :- माणूस जगात येणे व जाने हे निसर्गाचे नियम आहे, परंतु जगात येऊन मानवजाती साठी चांगले कार्य उपक्रम करणे, असे चांगल्या लोकांचे गुणधर्म असतात असे अनेक उदाहरण निदर्शनास येतात, असे एक उदाहरण म्हणजे, मा, नगरसेवक रफिक भाई, रफिक भाई यांनी कामगारांच्या न्याय व हक्का साठी लढा देते, नेहमी गोरगरिबांची मदत केली आहे, कित्तेक गोर गरिबांची चूल पेटवण्याचे कार्य स्वर्गीय रफिक भाई शेख यांच्या हस्ते झाले आहे,
स्वर्गीय रफिक भाई शेख यांच्या स्मरणार्थ रफिक भाई मित्र मंडळ चे प्रमुख मजीद भाई शेख (दादा ) यांच्या हस्ते, रक्तदान शिबीरे, भव्य शरबत वाटप असे नेहमी चांगले सामाजिक उपक्रम राबविले जातात,
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, व भारतरत्न डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त, स्वर्गीय, रफिक भाई शेख यांच्या स्मरनार्थ,स्व, रफिक भाई मित्र मंडळ, तर्फे मनमाड शहरात महामानव डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंतीस रथामध्ये येणाऱ्या अनुयायिंची तहान मिटविण्यासाठी थंड शरबत वाटप करून, असे चांगले उपक्रम राबविण्यात आले, या वेळी आयोजक, मजीद भाई शेख, (दादा ) व ,स्व, रफिक भाई मित्र मंडळचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,
0 टिप्पण्या