![]() |
| बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003. |
मनमाड .जन आवाज न्युज वृत्तसेवा.राजेंद्र धिंगान प्रतिनिधी मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल, कार्यालयीन आधिक्षक अशोक पाईक आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने याच्या , आधिपत्याखाली प्रभागातील सुपरवाँझर राजेंद्र धिंगाण , संजय बहोत ,प्रभाग प्रमुख. सुरज चावरीया, संतोष वानखेडे .बाळू सकंट अधिपत्याखाली स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मांझी वसुंधरा ३० मार्च २०२३ रोजी स्वच्छोत्सव मनमाड नगर परीषद मार्फेत international,day ,of zero wasteदिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमास मनमाड नगर परिषदेचे . कर्मचारी सह आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांनी
शहरातील विविध भागामध्ये स्वच्छता मोहीम सह कर्मचारी आणि नागरिकांश संवाद साधून जनजागृती केली.
या सर्व भागामध्ये एकूण विवीध भागधारकांची कचरा वर्गीकरण याबाबतीत . संवाद साधून जनजागृती केली.
या सर्व भागधारकांना कचऱ्याचे घटक समजावून सांगण्यात आले. ओला कचरा, सुका कचरा आणि घातक कचरा तसेच यामध्ये येणाऱ्या घटकांची सविस्तर माहिती दिली.
1)जो कुजतो तो *ओला कचरा* ओल्या कचरामध्ये फळांच्या साली, अंड्याची टरफले, उरलेले शिळे अन्न, मटण आणि चिकन व त्याची उरलेली हाडे, चहा पावडर, पानांची पत्रावळी, फुले व फुलांचे हार, केसांची गुंतावळ, नारळाची करवंटी, भाज्यांचे देठ, पालापाचोळा, पाने, शेंगाची टरफुले, उसाचा चोथा, गवत, फांद्या, मक्याचे कणीस, गव्हाचा कोंडा, इत्यादी घटकांचा समावेश होतो.
2) जो कुजत नाही तो *सुका कचरा* याचा पुनर्वापर होऊ शकतो यामध्ये पुठ्ठा, प्लास्टिक, कागद, प्लास्टिक बॉटल, कपडे, जुने चप्पल/बूट, सिरॅमिक वस्तू, लोखंड, थर्मकोल, चॉकलेट/बिस्कीट ची रॅपर, रिकामी दूध पिशवी, इत्यादी घटकांचा समावेश होतो.
3) *घातक कचरा* यामध्ये सिरीज, वापरलेले ब्लेड, सॅनिटरी पॅड/नॅपी, फुटलेले ब्लब, प्रेग्नन्सी किट, खराब बॅटरी/सेल, मुदत सम्पलेली गोळ्या व औषधे, फुटलेल्या काचा व इत्यादी घटकांचा समावेश घातक कचऱ्यामध्ये होतो.
घातक कचरा हा घंटागाडी हेल्पर कडे कागदात गुंडाळून वेगळं द्यावा अशी माहिती सांगितली.
कचरा वर्गीकरण करून घंटागाडीतच टाकावा तसेच तो इकडेतिकडे उघड्यावर किंवा कचराकुंडीत टाकू नये, अशी माहिती स्वच्छता कर्मचाऱ्याना सांगण्यात आली. यावेळी सागर आ ही रे , विजयघुगे , संजय छजलाना, संजय देठे , राजू खलसे , शशी धिंगान , उमेशचुनियान , भास्कर हरी , मुकेश साळवे, सुजीत टाक , मनोज चावरीया, अतुल शिंदे , निखील करोसीया , अर्जुन बेद , धर्मा पाथरे , प्रकाश खलसे , प्रकाश पाथरे , भारत त्रिलोक,. उमेश चुनियान , भास्कर दिबंर , संतोष जाधव , संतोष चव्हाण सुमेध विलास अन्य कर्मचारी सामिल होते



0 टिप्पण्या