नाशिक::- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात आज तालुका सहायक निबंधकासह लिपिक गळाला लागला आहे. गेल्या वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई ठरली आहे. सहकार विभागांतर्गत नासिक तालुका सहायक निबंधक २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला आहे. लाच स्वीकारताना तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग दिसून आल्याने सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. लाचलुचपत विभागाकडून प्राप्त माहितीनुसार लाचखोर सहाय्यक निबंधक आलोसे रणजित पाटील व वरिष्ठ लिपिक आलोसे प्रविण अर्जुन वीरनारायण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तक्रारदारावर सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी पाटील याने २० लाख रुपयांची लाच मागितली होती. या सर्व प्रकारात वरिष्ठ लिपीक वीरनारायण याचाही सहभाग असल्याची तक्रार आलेली होती. त्यानुसार एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी सापळा रचण्यात आला व दोघा आलोसे यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या