मनमाड. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनात मनमाड जेऊर रात्रीची बस ही एक दीड तास आधी करावी या साठी शिवसेना महिला आघाडीने डेपो मॅनेजर मनमाड बस डेपो यांना निवेदन दिले.
मनमाड येथे शिक्षण घेण्यासाठी अनेक विध्यार्थी व विद्यार्थिनी हे #मनमाड - #जेऊर या बसने प्रवास करतात. या बस मध्ये याणाऱ्या विध्यार्थिनीची संख्या लक्षणीय आहे. यात आस्तगाव, खादगाव, भार्डी, धनेर, जेऊर येथून विद्यार्थिनी येत असतात. या बस ची वेळ रात्री 8 वाजता आहे. सायं 5:30 वा. शाळा सुटल्यानंतर सदरील विद्यार्थिनी हया रात्री 8:00 वाजेपर्यंत मनमाड डेपो परिसरात बसून असतात. उशीर होत असल्या कारणाने काळजीपोटी अनेक विद्यार्थिनीची शाळा पालकांनी बंद केली आहे त्यामुळे त्यांना शिक्षणापासून मुकावे लागले आहे. सदरील बस हि जेऊर येथे मुक्कामी जात असते. सदरील बसची वेळ 1 ते 1:30 तास आधी केल्यास या विद्यार्थिनीची सोय होईल.असे शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे यांच्या लेटरपॅड वर सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नाजमा मिर्झा,सुरेखा ढाके, नीता लोंढे, अलका कुमावत, लक्ष्मी अहिरे उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या