Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड . जन आवाज न्युज वृत्तसेवा . राजेंद्र धिंगान मनमाड स्वच्छोत्सव - २०२३ अभियान अंतर्गत आज दि.२९/०३/२०२३ रोजी मनमाड नगर परिषद,मनमाड. मार्फत गणेश कुंड ,गुरुद्वारा परिसर, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा परिसर ,छत्रपती शिवाजी महाराज चौक ,सुभाष रोड परिसर, नेहरू भवन परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मशाल मार्च (रँली )काढण्यात आली .तसेच गणेश कुंड परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज चौक व मनमाड नगर परिषद कार्यालयात अधिकारी,कर्मचारी,नागरिक यांना स्वच्छ शपथ देण्यात आली.


         सदर कार्यक्रमास मनमाड नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल ,कार्यालयीन अधिक्षक  श्री.अशोक पाईक,स्वच्छता  निरीक्षक श्री. विजय सोनवणे,स्वच्छता पर्यवेक्षक श्री.राजेंद्र धिंगाण,मटरुलाल  चुनियान,सुरज चावरिया,मिथुन धिंगाण,संतोष वानखेडे,सतीश चावरिया,अतुल शिंदे,निखील करोसिया,व स्वच्छता विभागातील कर्मचारी,नागरीक मोठ्या संखेने  उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या