नाशिक.सर्वधर्मसमभाव अशा तत्त्वावर शिक्षण दिन देणारी द प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी संचलित स्कूल मध्ये पारंपारिक रित्या गुढी उभारण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक अमोल कदम सर यांनी गुडीची विधिवत पूजा केली.
शाळेचे शिक्षक श्री तुषार पाटील यांनी
गुडी पाडवा चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. या दिवशी गुढीपाडव्याचा सण देखील साजरा केला जातो. मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो.
अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
विद्यार्थ्यांना नूतन मराठी वर्षाच्या शुभेच्छा या मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून देण्यात आल्या शाळेमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले. छाया ढिलोर


0 टिप्पण्या