Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कृषी उत्पन्न बाजार समिती ने शेतकऱ्यांचे पैसे परत न केल्यास प्रहार शेतकरी संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा.


  जन आवाज न्युज संपादक.


आफरोज अत्तार. 

नांदगाव. कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव चा जाहीर निषेध प्रहार शेतकरी संघटनेने निवेदन देऊन व आंदोलन करून एक वर्ष पूर्ण होत आले असून आज पावतो मागील वर्षी विक्री केलेले लाल कांद्याचे 25 शेतकऱ्यांचे चार लाख रुपयेची बिले अजून मिळालेली नाही कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलठाण येथे मागील वर्षी 25 शेतकऱ्यांनी हसणे ह्या व्यापाऱ्यास आपला कांदा हा शेतमाल बोलठाण उपबाजार समितीच्या आवारात आवारात विक्री केला होता परंतु आज पावतो सदर शेतकऱ्यांचे चार लाख रुपये संबंधित व्यापाऱ्याने दिलेले नाही व सदर व्यापाऱ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन पाठीशी घालण्याची भूमिका घेत आहे तसे बघता कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशांमधून १% मार्केट फी वसूल करते व त्यांच्याकडे तोलायची कुठलीही व्यवस्था नसताना व तोलाही शेतकऱ्यांकडून वसूल करते शेतकरी हे आपला मालाचा निलाव झाल्यानंतर खाजगी वजन काट्यावर जाऊन आपल्या मालाची तोलाई करून घेतात प्रतिवाहन ५०रु प्रमाणे बिल अदा मग शेतकऱ्याच्या मालाचेही पैसे देतो मग बळीराज्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बापाची ठेव आहे का. शेतकऱ्यांकडून तोलाई व वाराई ही वेवस्था त्यांच्याकडे नसतांनाही ही सरळसरळ शासन मान्यता प्राप्त बेकायदेशीर हप्ता वसुली अडा आहे..सबंधित २५.शेतकऱ्यांचे चार लाख रुपये तत्काळ द्यावे तसे न झाल्यास कृषी उत्पन्न उप बाजार समिती बोलठाण येथे शेतकऱ्यानं समवेत आमरण उपोषणाला बसणार असून ह्या पासून होणाऱ्या परिणामस सर्वस्वी आपले प्रशासन जबाबदार राहील.असे निवेदन देण्यात आले.
संदिप सूर्यवंशी प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष नांदगाव प्रहार संघटना नांदगाव...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या