मनमाड नगरपरिषद लाचखोर कर्मचारीवर ACB ची कारवाई,36,000 ची लाच स्वीकारतांना रांगेहात अटक,

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.
मनमाड :- मनमाड नगरपरिषद येथे तक्रारदार हे काम करत असलेल्या कन्स्ट्रक्शन फर्म चे बिल नगरपरिषद कार्यालय मनमाड येथे जमा करण्यात आलेले होते. संबंधित कामाच्या बिलाचा चेक तयार करून चेक काढून दिल्याच्या मोबदल्यात यातील आरोपी 1) आनंद प्रभाकर औटी , वय-46 वर्ष, वरिष्ठ लिपिक, लेखा विभाग, नगरपरिषद,मनमाड. 2) संजय बबन आरोटे  वय.- 52 वर्ष.व्यवसाय -रोखपाल ,लेखा विभाग, नगर परिषद मनमाड, 3) नंदू पंडीत म्हस्के वय.- 58 वर्ष. व्यवसाय- शिपाई. लेखा विभाग नगर परिषद मनमाड  यांनी दि.02/ 03/2023 रोजी टक्केवारीनुसार 36,000/- रुपये लाचेची मागणी केली होती, म्हणून 
त्रस्त तक्रारदार तर्फे लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांना तक्रार केल्या प्रमाणे, दि 03 /03/2023 रोजी  लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक यांच्या तर्फे सापळा रचुन कारवाई करण्यात आली आहे,
सदर कारवाईत मनमाड नगरपरिषद लाच खोर कर्मचारी तर्फे  36,000 रु लाच स्विकारतांना अटक करण्यात आली व 36,000 मुद्दे माल हस्तगत करण्यात आले आहे, पुढील कारवाई सुरु असतांना गुन्हा दाखल करण्याचे कार्य सुरु होते, सापळा रचून मनमाड नगर परिषद लाच खोर अधिकारी यांचेवर कारवाई करणारे अनिल बागुल, पोलीस   निरीक्षक , अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक.सापळा पथक पो. ना. किरण अहिरराव,  पो. ना.अजय गरूड,चा. पो ना. परशुराम जाधव.सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो, नाशिक उपस्तित होते सदर कारवाई ही मा.सौ.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर साो, 
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व  मा.श्री.एन. एस.न्याहळदे, साो. व अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.  मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मार्गदर्शनाखाली करण्यात आली, 
कारवाई नंतर लाच लुचपट प्रतिबंध विभागात तर्फे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात आले ,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा,