Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका यांच्या वतीने 8मार्च धरणे आंदोलन

 

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका यांच्या वतीने 8मार्च धरणे आंदोलन

जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
 नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील सर्व 11 लाखाहून अधिक ठेवीदारांच्या सुमारे दोन हजार कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत,नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक 2016 पासून बँक आर्थिक अडचणीत आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदारांना त्यांचे जमा पैसे परत मिळावे या करीता,पद्मभूषण मा. अण्णासाहेब हजारे प्रनित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास नांदगाव तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत,आंदोलना पुर्वी मा. विभागीय सहनिबंधक श्री गावडे साहेब,जिल्हा बँकेचे प्रशासक श्री चव्हाण साहेब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंगळे साहेब यांच्याशी दि 28 फेब्रुवारी 2023 रोजी बैठक घेन्यात आली परंतु बैठकीत जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांना त्यांची स्वतः ची जमा रक्कम परत देण्यास सर्व अधिकारी यांनी असमर्थता दाखवली आहे,व चर्चेतून कोणताही निर्णय न झाल्यामुळे नाईलाजाने ठेवींची रक्कम परत मिळावी या करीता आंदोलन करावे लागनार आहे, धरणे आंदोलन दि.08 मार्च 2023 रोजी दुपारी 12:00 वा सुरू होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व ठेवीदार व खातेदार यांनी बहुसंख्येने आंदोलनात सहभागी रहावे असे अवाहन भिमराज लोखंडे, भास्कर झाल्टे,विष्णु चव्हाण, रामदास दुभासे यांच्या वतीने करण्यात येत आहे... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या