संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी झाला गुन्हा दाखल.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. आपल्या आक्रमक व परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान नुकतेच निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना पक्ष चिन्ह व नाव हे एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असताना आता ठाकरे गटाचे अत्यंत जवळचे नेते असलेले खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. नेमका वाद आहेत तरी काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं.
यावर राऊतांचं उत्तर...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या