Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

भारतीय रेल्वे महिनाभर सखोल सुरक्षा मोहीम राबवणार


भारतीय रेल्वे महिनाभर सखोल सुरक्षा मोहीम राबवणार

जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
रेल्वेगाडी रुळावरून घसरणेधोकादायक सिग्नल पासिंग आणि इतर संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून भारतीय रेल्वे आजपासून महिनाभर तीव्र सुरक्षा मोहीम राबवणार आहेयासाठी रेल्वे मंडळविभागीय रेल्वे आणि विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध विभागलॉबीदेखभाल केंद्रे किंवा कामाच्या ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतयाशिवाय त्यांना अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या असामान्य घटना टाळण्यासाठी विहित केलेल्या सुरक्षित कार्यान्वयन आणि देखभाल पद्धतींची खातरजमा करून  त्यांची  प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कामकाजाच्या पद्धतींचा सखोल आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेतसहाय्यक लोको पायलट किंवा लोको पायलटद्वारे सिग्नलिंग प्रक्रिया आणि ब्रेकिंग पद्धतींचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवणेगतीविषयक निर्बंधांचे पालनट्रॅक मशीन्स किंवा टॉवर वॅगन्सच्या चालकांचे समुपदेशनकामाच्या ठिकाणी सुरक्षितताकुठल्याही  शॉर्टकटचा वापर  करणे,  यावर भर देण्यात आला आहेअधिकाऱ्यांनी विभागलॉबीदेखभाल केंद्रेकिंवा कामाच्या ठिकाणी अधिकाधिक वेळ देऊन कार्यान्वयन/देखभाल/कार्य पद्धती यांचे निरीक्षण करावे आणि कर्मचाऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य पद्धतींविषयी चर्चा करावी आणि उपाय सुचवावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या