Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी



महाविकास आघाडी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी.

 जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
मनमाड.दि. 19:सायंकाळी 5:00 वाजता एकात्मता चौक येथे महाविकस आघाडी तर्फे शिवजन्मोत्सव निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले गेले, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तेथून छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महाआर्तीचे प्रयोजन केले गेले

यामध्ये मनमाड शहरातील अलोट जनसमुदाय मग त्यात प्रत्येक जातीधर्माचे लोक, आबालवृद्ध, युवा,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय आनंदमय वातावरणात भव्य अतिषबाजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांनी घोषणा देत शिवजन्मो्सव साजरा केला गेला यामध्ये माजी आमदार राजा देशमुख शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे दिंडोरी विधासभा मतदार संघ सह संपर्क प्रमुख पिंटु नाईक,ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उप जिल्हा प्रमुख संतोष बळीद,शहर प्रमुख माधव शेलार,मनमाड शहर काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष नाझिम शेख, शुभाष नहार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिपक गोगड व नगरसेवक,सर्व पक्षीय पदाधिकरी, कार्यकर्ते, महिला आघाडी, व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या