कांदा अग्निडाग कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहो यासाठी शेतकऱ्यांनी लिहिले आपल्या रक्ताने पत्र.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
कांदा उत्पादनांत अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्हयात अनेक अडचणींवर मात करत शेतक-यांनी कांद्याच उत्पादन घेतले मात्र सध्या कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झालाय. येवल्याच्या नगरसुल येथिल शेतकरी कृष्णा डोंगरे याने थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून शेतक-यांपुढे अनेक प्रश्न असतांना त्याला कांदा रडवतोय.त्याचा उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरी विरोधी आहे, आपणही शेतक-याचे पुत्र असून आपण या विरोधात आवाज उठवायला पाहिजे होता.मात्र आपणही गप्प का. असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात विचारलाय. तर आपण काही करु शकत नसाल तरी मी ठेवलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण त्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात केलेय, ही सर्व पत्र कृष्णा याने पोस्ट सुध्दा केलीय.
कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या सहा मार्चला आपल्या शेतातील कांद्याला अग्निडाग देण्याचा समारंभाचे आयोजन केले असून त्याच्या जाहीर निमंत्रण पत्रिका त्याने छापल्या आहेत आणि त्या सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे काही वर्षा पुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा याने आपल्या शेतातील कांदा जाळला होता. त्यावेळी मोठी चर्चा माध्यमां मधून झाल्याने विरोधी पक्षाच्या खासदार सुप्रिर्याताई सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती. येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने कांदा अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे.
याची निमंत्रणपत्रिका मुख्यमंत्र्यांच्या नावे व्हायरल होत असून पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले आहे.यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले आहे की, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरी विरोधी आहे. आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे विचारला आहे. आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या