Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महापुरुषाचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात यावे. रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन.

 

महापुरुषाचे पूर्णाकृती पुतळे बसविण्यात यावे. रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन.

जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.

मनमाड. मनमाड नगरपालिका खाली आज सकाळी ११:०० वाजता प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक दिवसापासून समस्त मनमाड करांची इच्छा आहे कि, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यात यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या महापुरुषांचा वापर मत घेण्यासाठी होत आहे. तरी आपण लोक भावनेचा आदर करून त्वरित आपण दोन्ही महापुरुषाचे पूर्णाकृती पुतळे 14 एप्रिल पर्यंत बसविण्यात यावे. अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या टक्केवारी घेऊन बंगले बांधणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला गावात फिरू देणार नाही असे  पत्रकारांशी बोलताना ऍड प्रमोद अहिरे यांनी सांगितले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन नगरपालिका प्रशासन यांना देण्यात आले यावेळी दिनकर धिवर, दिलीप नरवडे, कैलास अहिरे गुरु कुमार निकाळे, ऍड प्रमोद अहिरे,व रिपाई पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या