Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

येत्या ९ तारखेपासून आमदार चषक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा स्पर्धेत ४८ पुरुष व १४ महिला संघ घेणार सहभाग.



येत्या ९ तारखेपासून आमदार चषक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा स्पर्धेत ४८ पुरुष व १४ महिला संघ घेणार सहभाग.

जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.

मनमाड  :  येत्या ९ तारखेपासून आमदार चषक प्रौढगट महिला व पुरुष जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी ४८ पुरुष व १४ महिला संघ सहभागी होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जय भवानी व्यायाम शाळेत आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र पगारे, प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, संयुक कार्यवाह सतिष सूर्यवंशी उपस्थित होते. येत्या ९ डिसेंबर पासून आमदार चषक प्रौढगट महिला व पुरुष जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेला आमदार सुहास कांदे यांच्या आमदार निधीतून आणि राजेंद्र पगारे यांच्या सहकार्याने या स्पर्धा संपन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत ४८ पुरुष व १४ महिला संघ सहभाग घेणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन ९ तारखेला सकाळी होणार आहे. या स्पर्धेतून राज्य निवड स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे पुरुष महिला संघ निवडले जाणार आहे. सदर सामने दररोज सकाळी १० ते सायंकाळी १० वाजेपर्यंत खेळवले जाणार आहे. ६० पुरुष तर २० महिला सामने असे एकूण ८० सामन्यांचा थरार कबड्डीप्रेमींना बघावयास मिळणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेतून एकूण २२ खेळाडूंची निवड होणार असून या २२ खेळाडूंमधून १२ खेळाडू प्रौढगट महिला व पुरुष जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेतून निवडले जाणार आहे. या स्पर्धेला आमदार सुहास कांदे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयवंत जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी रहेमान शेख, राजू डमरे, वाल्मिक बागुल, विलास मोरे, सुधाकर कातकडे, शाकिर शेख, सतिष सूर्यवंशी, राजेश निकुंभ, शेखर आहिरे आदी स्पर्धेची पूर्वतयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या