Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे चैत्यभूमी दादर येथे जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी अन्नदान करण्यात आले.

 

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन तर्फे चैत्यभूमी दादर येथे जाणाऱ्या भीमसैनिकांसाठी अन्नदान करण्यात आले.

जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे व झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्यभूमी (दादर) येथे अभिवादन करण्यासाठी जाण्या-या भिमसैनिकासाठी अन्नदान करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे,मा.नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे, गौतम वाघ, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे,दि मध्य रेल्वे कंन्झुमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड चे संचालक रत्नदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर आदी उपस्थित होते.


यावेळी प्रमुख पाहुणे च्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व अन्नदान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जोगदंड यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.सागर साळवे यांनी बौद्ध वंदना घेतली.
कार्यक्रमाचे आयोजन माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे, कार्यालय सचिव संदीप पगारे, हनुमान अहिरे, कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे, किरण वाघ,दिपक बागुल, फकिरा सोनवणे, विनोद झोडपे, साईनाथ लांडगे, रविंद्र पगारे, सम्राट गरुड, भिमराव धिवर, सतिश झाल्टे आदी ने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या