समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून होणार खुला; द्यावा लागणार एवढा टोल.
जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.
मुंबई .देशाची आर्थिक व महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर यांना जोडणारा ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग आता सज्ज झाला आहे. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबरला होणार आहे. हा महामार्ग देशातील सर्वात वेगवान अशा महामार्गांपैकी एक असणार आहे. तो बनवण्यासाठी सुमारे ५ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. या महामार्गावर ताशी १५० किमी वेगाने वाहने चालवता येतील. ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 11 डिसेंबरला होणार आहे.नागपूर ते शिर्डी पर्यंतचा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान १२ जिल्ह्यातून जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि मुंबई हे जिल्हे आणि जवळपास २६ तालुके आणि ३९२ गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH3, NH6, NH7, NH69, NH204, NH211, NH50 यांचा समावेश होतो.
एवढी असेल वेगमर्यादा महामार्गाची एकूण रुंदी १२० मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अशा आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका ही २२.५ मीटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा १५० किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करायची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही. या महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने इत्यादी उभारण्यात येणार आहे. जवळपास ५० पेक्षा जास्त उड्डाणपुल, २४ हून आधिक इंटरचेंजेस वे तसेच ५ बोगदे प्रस्तावित आहेत.
इतक्या वर्षांसाठी टोल
या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. या प्रवासासाठी ६ ते ७ तासांचा कालावधी लागणार आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून चर्चेत असणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा दिवाळीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या मार्गावर टोल दराची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. येत्या तीन वर्षांसाठी म्हणजे २०२५ पर्यंत हे टोल दर लागू असणार आहेत. नागपूर ते मुंबई असा थेट ७०१ किमी अंतरासाठी जवळपास १२०० रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. चार चाकी वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये टोल आकारणी होणार आहे. हा महामार्ग खासगी भागीदारीतून होणार असल्यामुळे टोलही पडणार आहे. टोल हा प्रवास केलेल्या अंतरावरच पडणार आणि तो स्वयंचलित असणार आहे.
वाहनांनुसार टोल समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईचा प्रवास ८ तासात पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गावर मोटर, जीप, व्हॅन आदी हलकी मोटर वाहनांसाठी १.७३ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. तसेच हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बससाठी २.७९ रुपये प्रतिकिमी दर इतका टोल असणार आहे. बस, ट्रकसाठी ५.८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल दर असणार आहे. त्याशिवाय, तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ६.३८ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे. अवजड बांधकाम यंत्रसामग्री, अनेक आसांच्या वाहनांसाठी ९.१८ रुपये आणि अतिअवजड वाहनांसाठी (चौदा किंवा जास्त चाकांची वाहने) ११.१७ रुपये प्रतिकिलोमीटर इतका टोल असणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या