प्रमुख रस्त्यासह पालिकेच्या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही बसवण्याची रिपाइंची मागणी.
जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.
मनमाड - नाशिक जिल्ह्यातील मनमाड हे प्रमुख रेल्वे स्टेशन असलेले हजारो लोक या शहरातून जा ये करत असतात. मागील काही दिवसापासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. मोटर सायकली चोरी, मंगळसूत्र चोर व भुरट्या चोरांनी गावात धुमाकूळ घातला आहे. दर दोन चार दिवसांनी गावात मोटर सायकल चोरीची घटना घडत आहे तसेच दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मानव जातीला कालिमा फासवणारी घटना घडली. लोकेश सोनवणे या नऊ वर्षीय बालकांची निर्घृपणे हत्या हत्या करण्यात आली. त्यामुळे पुर्ण मनमाड शहर हादरुन गेले आणि पुन्हा एकदा लहान मुल आणि
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होता. मनमाड नगर पालिकेने मानव हिताच्या दृष्टिकोनातून लवकरच शहराच्या प्रमुख रस्त्यावर व नगर परिदेच्या सर्व शाळांच्या आवारात सीसीटीव्ही बसवाव्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिनकर धिवर, तालुका अध्यक्ष कैलास आहिरे, शहर अध्यक्ष दिलीप नरवडे, युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, व शहर सचिव, अॅड. प्रमोद आहिरे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व यापुढील होणाऱ्या परिणामास मनमाड नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या