प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणुन नियुक्ती....
मनमाड : मनमाड शहराचे भुमीपुत्र आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन समाजात ओळख असणारे प्रा.नितीन लालसरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'जनसंपर्क अधिकारी' म्हणुन पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षांपासुन प्रा.लालसरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यांचे अत्यंत विश्वासु अधिकारी म्हणुन काम करत आहे. गेल्या सरकारमध्ये देखील प्रा.लालसरे यांच्याकडे नामदार श्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन जबाबदारी होती .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासु आणि जबाबदार अधिकाऱ्यांपैकी प्रा.नितीन लालसरे हे एक असुन , काही महिन्यांपूर्वी मनमाड येथे संपन्न झालेल्या प्रा.लालसरे यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी देखील नामदार एकनाथ शिंदे आवर्जुन उपस्थित होते. आयुष्यातील आलेल्या अनेक अडचणींवर मात करून , कठोर परिश्रम , उच्चशिक्षण घेऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबातुन मोठे झालेले प्रा.नितीन लालसरे यांची राज्याचे मुख्यमंत्री यांचे 'जनसंपर्क अधिकारी' या अत्यंत महत्वाच्या पदावर झालेली नियुक्ती ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या पदाला नक्कीच न्याय देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने समाजातील गरजवंत नागरिकांची सेवा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया प्रा. नितिन लालसरे यांनी दिली. मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी या महत्वाचा पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल समाजातील सर्व स्थरातुन प्रा.नितिन लालसरे यांचे अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या