केंद्र सरकारच्या कामगार कायद्यातील संभाव्य बदलाबाबत
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन
केंद्र सरकार कामगार कायद्यात बदल करीत आहे.. त्याचा फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना जसा बसणार आहे तसाच तो श्रमिक पत्रकारांना देखील बसणार आहे.. कारण सरकार १९५७ चा श्रमिक पत्रकार कायदाच मोडीत काढत आहे..त्यामुळे वेजबोर्ड आणि पेन्शन आणि अन्य काही संरक्षण रद्द होऊन मालकांची मनमानी वाढणार आहे.. त्या संबंधी राज्य सरकारचे १८० पानांचे एक नोटिफिकेशन १८ जुलै रोजी कामगार आयुक्तांनी प्रसिध्द केले आहे..कामगार कायद्यातील बदलाबाबत ४५ दिवसात हरकती आणि आक्षेप मागविण्यात आले आहेत.. ही मुदत उद्या संपणार आहे.. नवीन कायद्याचं जे प्रारूप प्रसिध्द झालं आहे त्यावर हरकती आणि सूचना करण्यासाठी मुदतवाढ मागून घेण्याचा निर्णय बीयुजे, मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ, आदि पत्रकार संघटनांनी घेतला आहे. त्यासाठी बीयुजेचे इंदरकुमार जैन वकिलाशी चर्चा करीत आहेत.. पत्रकार संघटनांनी वेगवेगळ्या हरकती घेतल्या तर त्या कदाचीत परस्पर विरोधी मतं व्यक्त होऊ शकतात .. हे टाळण्यासाठी सर्वमान्य होईल असा हरकती आणि सूचनांचा मसुदा तयार करण्यात येणार आहे.. वकिलांनी तयार केलेला हा हरकतीचा मसुदा कामगार आयुक्तांकडे सादर केला जाईल.. कामगार कायद्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या पोस्ट सध्या सोशल मिडियावर फिरत आहेत.. १८० पानांचं वाचन न करता यातील काही पोस्ट तयार केल्या आहेत.. काहींनी कायदेशीर संरक्षण रददचा अर्थ पत्रकार संरक्षण कायदा रद्द असा घेऊन तश्या पोस्ट व्हायरल केल्या.. तसं नाही.. हा केंद्राचा कायदा असल्याने त्याचा महाराष्ट्र सरकारच्या पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार सन्मान योजना अथवा शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतींवर काही परिणाम होणार नाही.. उगीच पूर्ण अभ्यास न करता अफवा पसरवू नयेत ही विनंती.. कामगार कायद्यातील संभाव्य बदलानं सर्वच क्षेत्रातील कामगार बाधीत होणार असल्याने त्यातून मोठी अस्वस्थत:निर्माण होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर गुप्तता पाळली गेली.. त्यामुळे हा विषय माध्यमांना देखील कळला नाही.. मात्र ही गोष्ट संघटना म्हणून जेव्हा आमच्या लक्षात आली तेव्हा आम्ही योग्य ती कारवाई सुरू केली..श्री एस.एम देशमुख, मुख्य विश्वस्तश्री किरण नाईक. विश्वस्त
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या