महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे रिपाई तर्फे आंदोलन करण्यात आले
वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि ग्राहकांच्या समस्या सोडवण्यात यावे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे मनमाड - येवला रोड येथील ऊर्जा भवन कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन करण्यात आले. तसेच संबंधित अधिकारी एस.बी. शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
मनमाड शहर हे कामगार वस्तीचे शहर असून याठिकाणी सर्वसामान्य , हातमजूर लोक मोठ्या प्रमाणावर राहतात.आपला विज ग्राहक मोठ्या प्रमाणावर शहरात असल्याने यात व्यावसायिक व घरगुती ग्राहकांचा समावेश आहे.परंतु सध्या ग्राहकांना विज कंपनीकडून दुजाभावाची वागणुक दिली जात असल्याने अनेक ग्राहकांच्या तक्रारी आल्या आहेत.सर्वसामान्य ग्राहकाकडे विज बिल थकीत असेल तर त्याग्राहकाकडे वसुली करीता आपले कर्मचारी गेल्यावर ग्राहकाकडून बिले दिले गेले नसेल किंवा मुदत मागीतली गेली असेल तेव्हा अशा परिस्थितीत ग्राहकाचे म्हणणे न ऐकूण घेता ग्राहकाचे मनमानी पध्दतीने विज कनेक्शन खंडीत केले जाते.तसेच वाढीव बिल आल्यास त्याची तक्रार करुन देखील समाधानकारक उत्तरे संबंधीत अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून दिली जात नाही. ग्राहकास समाधान होईल असे उत्तरे मिळण्याची अपेक्षा असतांना अधिकारी व कर्मचारी अत्यंत उर्मटपणाने ग्राहकांशी वागतात.तसेच कार्यालयात विज खंडीत झाल्याचा फोन केल्यास कर्मचारी फोन उचलत नाही , फोन घेणे हेतुपुरस्कर टाळतात त्यामुळे एक प्रकारे ग्राहकाचा अपमानच केला जातो असा सर्रास प्रकार कंपनीकडून सुरु आहे.
विज ग्राहकाकडून सक्तीची वसुली व वसुली न दिल्यास त्वरीत ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करणे हा प्रकार त्वरीत थांबविण्यात यावा.सध्या सर्वत्र गणेश उत्सव सर्वत्र मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा होत आहे या काळात देखील वि पुरवठा देखील अचानक खंडीत होणे यामुळे व्यत्यय निर्माण होत असल्याने ग्राहकांत नाराजी व्यक्त होते. या सर्व बार्बीची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही व्हावी , सर्वसामान्य ग्राहकांना सवलत देऊन सक्तीने विज वसुली थांबवावी तसेच ग्राहकाचा विज पुरवठा खंडीत करु नये , सुरळीत विज पुरवठा मिळावा व वाढीव येणाऱ्या विज बिलांची प्रकरणे निकाली काढावी सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरु नये, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी रिपाई जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, रिपाई जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर त्रिभुवन, रिपाई तालुका संपर्कप्रमुख पी.आर.निळे,शहराध्यक्ष दिलीप नरवडे, अॅड. प्रमोद आहिरे, गुरुकुमार निकाळे,सुरेश शिंदे,सुशील खरे,मोजेस साळवे, सुरेश जगताप, प्रदीप घुसळे ,शिलास पठारे, प्रशांत दराडे, नाना अहिरे ,धनंजय अवचारे, विशाल छाजेड, अकिल शेख आदि रिपाई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या