Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड पोलीसांतर्फे मनसेचे सहा पदाधिकारी ताब्यात,



मनमाड ता ४ : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा, नाहीतर त्याच्या दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे तर मनमाड शहरात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनमाड पोलिसांनी शहरातील मनसे चे सहा पदाधिकारींना ताब्यात घेतले असून. पोलीस स्थानकात ठेवण्यात आले आहे.


पाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीत पहाटेच्या अजानवेळी भोंगा लावला जातो तो बंद करावा असे म्हटले होते. राज ठाकरेनी इशारा देताना आम्ही भोंग्याविरोधात दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला होता. त्याअनुषंगाने 

आज मनमाड शहरात  कोणताही अनुचित प्रकार घडू नये व या संदर्भात कोणताही कायदा सुव्यवस्था बिघडू नये, प्रतिबंध म्हणून पोलिस एक्शन मोडवर येत सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांच्यासह पथकाने थेट मनसेचे शहराध्यक्ष सचिन शिरूड यांचे घर गाठले शिरूड यांना राहत्या घरून ताब्यात घेतले तर इतरही पाच जणांना ताब्यात घेण्यात येऊन सर्वांना पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे 




मनमाड : मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड यांना ताब्यात घेतांना पोलीस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या