Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राज ठाकरे वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मनमाड रिपाइंची मागणी



मनमाड ता ४ : एकीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढा, नाहीतर त्याच्या दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवू, असा इशारा दिला आहे तर दुसरीकडे शहर रिपाइं तर्फे भोंग्यांना संरक्षण देऊन धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या  राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आज रिपाईने मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना निवेदन दिले.




पालिका कार्यालयाजवळून रिपाइंचे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र आहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगादादा त्रिभुवन

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, जिल्हा संघटक अनिल निरभवणे, तालुकाध्यक्ष कैलास आहिरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने रिपाई पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते हातात निळे ध्वज घेऊन गळ्यात निळ्या मफलर घालत राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा येथील नगीना मशीद जवळ आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सध्या दंगली घडविण्याचे राजकारण सुरू असून हे कोणत्याही देशासाठी विकासाला अडथळा आणणारे आहे जातीधर्मात दंगली होऊ नये त्या दंगली रोखणे ही आपली सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे, धर्म आणि जातीच्या नावाने दंगली पेटवऱ्याचे षडयंत्र काही जातीयवादी शक्तीकरीत आहे. धार्मिक स्थळांचे भोंगे काढून टाका असा कायदा अथवा सर्वोच्च न्यालयाचा कोणताही आदेश नाही. धार्मिक स्थळे असो की कार्यक्रम सभारंभ असो, पोलीसांची रितसर परवानगी घेऊन, सायंकाळी दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत भोंगे वापरण्यास बंदीचा आणि शांतता झोन व सामान्य परिसरामध्ये विशिष्ट 'डेसिलब' तीव्रतेचा नियम पाळून भाँगा अथवा लाडस्पीकर वापरण्यास परवानगी आहे. मात्र जाती धर्माचे राजकारण करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही हिंदुत्ववादी संघटना दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहे. यापूर्वी देशात सर्वत्र शांतता अबाधीत असतांना तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जाहीर सभेव्दारे मुस्लिमांच्या भावन भडकविल्या जात आहे. सर्वच धार्मिक स्थळांवर असलेल्या भोंग्यांचा केवळ धार्मिक कामाकरीता त्याचा उपयोग केला जातो. मात्र राजकारण करून केवळ समाजा समाजात उद्वेष निर्माण करण्याचा प्रकार केला जात आहे. धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाका असे जातीयवादी राजकारण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खपवून घेणार नाही. केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार भोंग्यांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचे सर्वत्र पालन करावे लागते मात्र केवळ एकाच समाजघटकाला लक्ष केले जाते त्यामुळे मशिदीसह सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्याचे रक्षण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करेल, धार्मिक तेढ निर्माण करणाच्या राज ठाकरेंवर गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मंडल अधिकारी श्री नरोटे आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रल्हाफ गीते यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी दिनकर कांबळे, शेखर आहिरे, गुरू निकाळे, विलास आहिरे, सुरेश शिंदे, प्रशांत दराडे, नाना आहिरे, सुरेश जगताप, पद्माकर निळे, बाबा शेख, अरुणा जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते


मनमाड : येथील नगीना मशीद समोर राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भोंग्यांना संरक्षण देण्याची मागणी करतांना रिपाइं पदाधिकारी कार्यकर्ते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या