मनमाड ता ५ : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याच्या ट्रॅक्टरचा लिलाव होऊन बोली लागली असता ट्रॅक्टर खळ्यावर खाली करण्यासाठी गेला असता व्यापाऱ्याने कांदे घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्याने तक्रार करून व्यापाऱ्याला चांगलाच दणका दिला किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांनी तात्काळ बाजार समितीकडे तक्रार केल्यानंतर शेतकऱ्यास तात्काळ न्याय मिळाला.
शेतकरी संजय हेंबाडे यांनी मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये कांदा ट्रॅक्टर लिलाव करण्यासाठी आनला होता लिलाव सुरू असतांना कांदा व्यापाऱ्याने सांगितल्या प्रमाणे ट्रक्टरचे दोन फाळके पाडले. पडलेले कांदे पाहून व्यापाऱ्याने ७६५ रुपये क्विंटलला भाव दिला. सदर शेतकऱ्याने कांद्याने ट्रॅक्टर व्यापारी रुपेश ललवाणी यांच्या खळयात घेऊन गेला सदर ट्रॅक्टर खाली करण्यासाठी ट्रॅक्टरचे एक फाळके पाडले तेव्हा व्यापारी ललवाणी यांनी सांगितले की हा कांदा चाळीत भरण्यासाठी योग्य नाही. मला हा कांदा घ्याचा नाही. आणलेला ट्रॅक्टर परत घेऊन जा. त्यानंतर या शेतकऱ्याने बाजार समितीमध्ये संपर्क केला तसेच किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे यांना झालेला प्रकार कळला असता त्यांनी तातडीने बाजार समिती प्रशासनाला किसान सभेचे पत्र देत आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे बाजार समितीचे सचिव श्री राठोड यांनी प्रत्यक्ष पाहाणी केली आणि व्यापारी योगेश ललवाणी यांना कांदा ट्रॅक्टर खाली करण्यास सांगितले. त्यामुळे शेतकरी संजय हेंबाडे यांना न्याय मिळाला.
मनमाड : बाजार समिती प्रशासनाला निवेदन देतांना
किसान सभेचे जिल्हा संघटक विजय दराडे तर दुसऱ्या छायाचित्रात कांदा ट्रॅक्टरची पाहणी करतांना बाजार समितीचे कर्मचारी




0 टिप्पण्या