ध्वजारोहण,विहार प्रवेश, मुर्ती स्थापना व विहारात सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन थाटात संपन्न.
गिरणारे ता. देवळा, जिल्हा नाशिक येथे 22 मे 2022 रोजी बुद्ध मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. पंचशील ध्वजारोहन माजी पोलीस अधीक्षक डॉक्टर संजय अपरांती साहेब यांचे हस्ते तर विधिवत पूजन भंते बोधीपाल यांचे हस्ते झाले. तसेच भंते बोधीपाल यांनी फित कापून विहार प्रवेश करण्यात आला आणि त्यानंतर डॉक्टर संजय अपरांती व भंते बोधीपाल यांचे हस्ते मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच विहारामध्ये सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन द्रौपदाबाई कारभारी पवार यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रीमती मंदाकिनी ताई ईश्वर पाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान दादाभाऊ महाले, पत्रकार आयु गौतम कर्डक, भारतीय बौद्ध महासभेचे माजी येवला तालुका अध्यक्ष आयु म्हसु पगारे, समता सैनिक दलाचे मेजर आयु हिरामण अहिरे, हे होते आणि विशेष उपस्थिती म्हणून लाभलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा देवरे, संचालक दादाजी खैरनार, उपसरपंच रत्नाताई गाढे, पोलीस पाटील अनिल वाघ, ग्रामपंचायत सदस्य तुळसाबाई पवार, माजी उपसरपंच ईश्वर पाटील, सुदाम धनजी खैरनार, चंद्रकांत वाघ, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आयु गौरव पवार, संरक्षण सचिव आयु हरेश पगारे, बौद्धाचार्य राजू पगारे हे होते तर ठमा सखाराम पवार, कारभारी शिवराम पवार, निंबा चंदा पवार, मधुकर उमा पवार, पुंडलिक पवार, कैलास पवार, दीपक प्रभाकर पवार, नाना पवार, वाल्मीक पवार, धर्मा पवार, समाधान शिवराम पवार, मोहन पवार, विजय केदारे, साहेबराव पवार, सोमनाथ हिरे, आत्माराम खंडीझोड, समाधान पवार, अजय पवार, ईश्वर पवार, सतीश पवार,कुणाल पवार, आदेश पवार व हिरामण कारभारी पवार यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला, तर सूत्रसंचालन आयु. वाल्मीक कारभारी पवार यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या