Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

तुटलेल्या विद्युत तारेच्या धक्याने शेळ्यांचा मृत्यु....



मनमाड : येथील आश्विनी नगर गुजराथी मळा परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या पावसामुळे विद्युत पोलावरील तुटलेल्या तारेमुळे मीराबाई सुरेश गिडगे यांच्या मालकीच्या दोन शेळ्यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला.
    

काल सायंकाळी मनमाड आणि मग परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला , या मुळे काही ठिकाणी नागरिकांचे काही  प्रमाणात नुकसान झाले असुन , अश्विनी नगर येथील परिसरामध्ये तुटलेल्या विद्युत तारेमुळे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला , परीसरातील काही नागरिकांनी सांगितले की त्यांनी या कमकुवत झालेल्या विद्युत तारे बाबत अनेक वेळेला मनमाड येथील एम.एस.इ. बी.च्या कर्मचाऱ्यांना माहीती देऊन देखील त्या कडे दुर्लक्ष केले , या मुळेच हा प्रकार झाल्याचे  नागरिकांना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या