देवगिरी एक्स्प्रेसवर अज्ञात चोरट्यांतर्फे दगडफेक करत दंगल स्टाईलने दरोड्याचा प्रयत्न,
मनमाड ता २३ : सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेसवर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रवाश्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजे खिडक्या बंद केल्याने अनर्थ टळला मात्र
यात एका महिलेची सोन्याची पोत लुटली गेली. गाडी मनमाड स्थानकावर येताच लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाने गाडीत जाऊन प्रवाश्यांकडून घटनेची माहिती घेतली सुमारे २ लाख किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
औरंगाबाद स्थानकातून मनमाडकडे देवगिरी एक्सप्रेस निघाल्यानंतर दौलताबाद - पोटूळ स्थानकादरम्यान हा प्रकार घडला.गाडी सिग्नल नसल्याने गाडी उभी असतांना अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी दगडफेक करायला सुरवात केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रवाश्यानी आरडाओरडा केल्याने अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पळून गेले. सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस अज्ञात चोरट्यांनी दगडफेक करीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रवाश्यांनी प्रसंगावधान राखत दरवाजे खिडक्या बंद केल्याने पुढील अनर्थ टळला मात्र.एका दरोडेखोराने खिडकीत हात घालून साडेतीन तोळ्यांचे सोन्याची पोत ओरबडली तर एका महिलेचा गळ्यातील पोत ओरबाडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.दौलताबाद - पोटूळ स्थानकादरम्यान हा प्रकार घडला.गाडी सिग्नल नसल्याने गाडी उभी असतांना अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी दगडफेक करायला सुरवात केली.अचानक झालेल्या प्रकारामुळे प्रवाश्यांमध्ये जोरदार खबराट पसरली.प्रवाश्यानी आरडाओरडा केल्याने अंधाराचा फायदा घेऊन दरोडे खोर पळून गेले.एस - ४ ते एस - ८ या बोग्यांना दरोडेखोरांनी लक्ष केले होते. या प्रकारामुळे प्रवाश्याच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरवर आला आहे.5 ते 6 दरोडेखोर असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सव्वादोन वाजता देवगीरी एक्सप्रेस मनमाड स्थानकातील फलाट क्रं ५ वर आगमन झाले. या दरम्यान स्थानकातील ध्वनीक्षेपणावरून घडलेल्या प्रकार बाबत तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. गाडी मनमाड स्थानकावर येताच. लोहमार्ग पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाने गाडीवर येऊन प्रवाश्यांकडून घटनेची माहिती घेतली देवगीरी एक्सप्रेसमधील एस - ४ या आरक्षीत बोगीतुन निजामाबाद ते मुबंई प्रवास करणाऱ्या लक्ष्मी प्रभाकर, वय -४५ , रा. मुबंई यांनी अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेवून खिडकीतुन गळ्यातील ३५ ग्रॅम सोन्याचे चैन चोरून नेले. अशी तक्रार मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे दिली. देवगीरी एक्सप्रेसच्या एस - ४ ते एस - ८ या बोग्यांना दरोडेखोरांनी लक्ष केले होते.
याप्रकरणी मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला व औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.
मनमाड : देवगिरी एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर आली असता प्रवाशांची चौकशी करतांना रेल्वे पोलीस




0 टिप्पण्या