महाराष्ट्रात भारनियमाची  परिस्थितीतीला मागील भाजपा शासन जबाबदार: ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची टीका,



मनमाड ता २३ : भारतीय जनता पक्षाने गेल्या पाच वर्षात विजेच्या क्षेत्रात कुठलेही भरीव कार्य केलेले नसल्यानेच आज महाराष्ट्रात भारनियमाची  परिस्थिती उद्भवली आहे अशी टीका ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली


ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज मनमाड येथे एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी येथील भुजबळांच्या रामकुंज बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी राज्यात सुरू असलेल्या भारनियमनावर बोलताना त्यांनी भाजपवर आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली कोळशाचा पुरवठा  केंद्रातून होत नसल्याने वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे भाजपने भरनियमनावर बोलण्यापेक्षा केंद्रातून कोळसा कसा उपलब्ध होईल हे पहावं भाजपच्या काळामध्ये महानिर्मिती मध्ये एक तरी कुठला  नवीन वीज निर्मिती प्रकल्प आणला आहे का असा सवाल उपस्थित करत ज्यांचे बिले थकीत आहे त्यांच्यासाठी नवीन योजना आणली असून त्यात व्याज दंड माफ केले जाणार आहे शेतकरी व सर्व सामान्यांना वीज बिल भरण्यास विनंती करा काही टप्प्यात बिले भरून घ्या लगेच वीज कनेक्शन तोडू नका वितरणाच्या अधिकाऱ्यांनी दोन तीन दिवसात अनधिकृत वीज कनेक्शन शोधून कारवाई करावी  वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर बडगा उगारला गेला पाहिजे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे काम सुरू आहे मागे आघाडीच्या काळात आम्ही भरनियमनमुक्त राज्य केले होते मात्र भाजपच्या काळात कोणतेही काम झाले नाही पेट्रोलचे दर कमी करायला सांगा भाजपला हे विषय सुचत नाही मात्र विरोधी पक्षाच काम करत असताना सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न ते विसरले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, सेवादलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब शेख, शहराध्यक्ष दीपक गोगड, महिला शहराध्यक्ष अर्पणा देशमुख, कार्याध्यक्ष नाना शिंदे, अक्षय देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते 


एका खाजगी कार्यक्रमाला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आले असता कार्यक्रमात भाषण करत असताना ऊर्जा मंत्र्यांनाही खंडित होणाऱ्या विजेचा सामना करावा लागला कार्यक्रमातच वीज गेल्याने अंधार पसरला होता तर काही वेळाने वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला मात्र शहरात रोज होणारे भरनियमन ऊर्जा राज्यमंत्री आल्याने झाले नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले त्यामुळे असे रोज दौरे झाले तर भरनियमन होणार नाही अशी चर्चा सुरू होती





मनमाड : पत्रकार परिषदेत बोलतांना ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे