मनमाड शिवसेना तर्फे भगवे झेंडे दाखवत घोषणाबाजी, खा.नवनीत राणा यांचा रेल्वे स्थानकावर विरोध.




मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आणि शिवसेना भवन असलेल्या मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीस पठण करण्यासाठी निघालेल्या खा. नवनीत राणा आणि आ. रवी राणा या 

विदर्भ एक्सप्रेसने येणार असल्याची माहिती मिळताच

मनमाड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला यावेळी पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे शाब्दिक चकमकही यावेळी झाली 


शिवसेनेवर टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवसस्थान मुंबई येथे जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे खा नवनीत राणा आणी रवी राणा हे विदर्भ एक्सप्रेसने रात्री मुंबईकडे जात असल्याचे समजताच मनमाड शहर शिवसेनेने रात्री २ वाजेच्या दरम्यान मनमाड रेल्वे स्थानकावर जाऊन  विदर्भ एक्सप्रेसमध्ये त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे पोलिसांनी शिवसैनिकांना अडवण्याचा प्रयत्न केला असता रेल्वे पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये शाब्दीक चकमक झाली.  यावेळी शिवसैनिकांनी रेल्वे स्थानकावर हातात भगवे ध्वज घेऊन जोरदार घोंषणाबाजी केली. उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, नवनीत राणा वापस जावो, वापस जावो, आवाज कोणाचा.. शिवसेनेचा आशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता राणा दांम्पत्याचा निषेध करण्यात आला मात्र या गाडीत राणा दांम्पत्य आलेले नसल्याचे समजले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजेंद्र भाबड, जिल्हा समन्वयक सुनिल पाटील, तालुका संघटक संजय कटारिया, सुभाष माळवतकर, शहरउपप्रमुख जाफर मिर्झा, छोटू धाकराव, दिनेश घुगे, युवासेनेचे शहराध्यक्ष अमीन पटेल, अंकुश गवळी, तालुका संघटक योगेश इमले, आशु पोहाल, सचिन दरगुडे, सिद्धार्थ छाजेड, योगेश शर्मा, आशिष पराशर, संघटक महेंद्र गरुड, कय्याम सैय्यद, वाहतूक सेनेचे अमजद शेख, बंटी आव्हाड, दिपक खैरे, दिपक मौर्य, ऋतिक मंगवाणा, संदिप गिरमकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



मनमाड : खा. नवनीत राणा आणि रवी राणा यांचा रेल्वे स्थानकावर निषेध करतांना शिवसैनिक