Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

चोरीला गेलेला मुद्दे माल,लोहमार्ग पोलिसांतर्फे नागरिकांना परत करण्यात आला,




मनमाड ता २९ : मनमाड लोहमार्ग पोलिसांनी मागील सप्टेंबर २०२१ पासून लोहमार्ग पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल, पैसे, व इतर वस्तू फिर्यादी यांना त्यांचे राहते पत्त्यावर मुंबई मे पुणे या ठिकाणी घरी नेऊन परत करण्यात आल्या तसेच समक्ष पोलीस ठाण्यात बोलावून परत करण्यात आले. असे एकूण ३१,२१,९३० रुपये किमतीकॅबि मालमत्ता हस्तगत करण्यामध्ये पोलिसांना यश आलेले आहे



न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही फिर्यादी यांना प्रवासाचे पैसे वाचावेत म्हणून कुरियर द्वारे मुद्देमाल त्यांचे घरी पाठवण्यात आला काही फिर्यादी यांच्या अकाउंटवर पैसे जमा करण्यात आले. यातील भारती अरूण ठोकळे (रा पुणे) यांची काजीपेट एक्सप्रेस मध्ये चोरी झालेली होती त्यांचे चोरी झाले ले ६ लाख ८० हजार रुपयांचे दागिने व मोबाईल पोलिसांनी ताबडतोब जप्त करून त्यांना परत केला तर अनेकांचे मोबाईल,  लॅपटॉप वेळेत परत मिळाल्यामुळे त्यामध्ये असलेला डाटा त्यांना परत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले तर कलाधरण पद्मकुमार (रा केरळ) हे त्यांच्या सहकाऱ्यासह उत्तर भारत या ठिकाणी कॅमेरासह शूटिंग कामी जात असताना त्यांचे ८ लाख २४ हजार रुपये किमतीचे कॅमेरे चोरीला गेले होते सदरचे कॅमेरे जप्त करून त्यांना परत केले लोहमार्ग औरंगाबाद येथील  पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, मनमाड येथील उपविभागीय लोहमार्ग पोलीस अधिकारी  दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सप्टेंबर २०२१ पासून लोहमार्ग पोलिस ठाण्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सोन्याचे दागिने लॅपटॉप मोबाइल पैसे व इतर वस्तू फिर्यादी यांना त्यांचे राहते पत्त्यावर मुंबई मे पुणे या ठिकाणी घरी नेऊन परत करण्यात आले तसेच समक्ष पोलीस ठाण्यात बोलावून देखील अनेकांना परत करण्यात आले. सदरची कामगिरी लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड,  पोलीस उपनिरीक्षक मधुकर लोखंडे , पोलीस हवालदार गोविंद दाभाडे, अंबादास जाधव, दिनेश पवार, पोलीस नाईक अमोल खोडके, किशोर कँडले, पोलीस अंमलदार विलास डोंगरे, राकेश सागर यांनी पार पाडले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या