![]() |
| मनमाड : अधिकारी आणि उपोषणकर्ते मध्ये चर्चा होताना |
मनमाड ता २९ : शहरातील जनता नागरी सहकारी पतसंस्थामधील अल्पबचत मुदत ठेवी वारंवार मागणी करून देखील खातेदारांना परत न मिळाल्यामुळे नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवीदार आणि अल्पबचत प्रतिनिधींनी बुधवार पासून आमरण उपोषण सुरू केले होते. आज गुरुवार(दि.२८) रोजी बैंकेचे अवसायक पी.बी.पाडवी यांच्या लेखी आश्वसानानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
जनता पतसंस्थेचे अवसायक पी.बी.पाडवी यांनी येथे येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली व उपरोक्त संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांनी विशेषांकात संस्थेचे १० मे २०२२पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण होऊन लेखापरीक्षण अहवाल सादर केला जाईल व सदर लेखापरीक्षण अहवालामध्ये अफरातफर व आर्थिक गैरव्यवहार असल्यास संबंधित लेखापरीक्षक हे संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करतील असे लेखी पत्र पी.बी.पाडवी यांनी संदीप सांगळे व इतर २८ उपोषणकर्त्याना दिले. प्रदिप धिवर,गणेश शिंदे,रविंद्र सोनार,संदिप उबाळे, प्रियंका धोंडके,गंगाधर भावे,धनंजय देशपांडे,चेतन सरोदे,प्रविण जाधव,गणेश नवले,हेमराज जंगम आदि अल्पबचत प्रतिनिधी व ठेवीदार ग्राहक आमरण उपोषणाचा मध्ये सहभाग घेतला. या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा देखील दिला.


0 टिप्पण्या