मनमाड ता २९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म म्हणजे अंधश्रध्दांचा मृत्यू आणि विज्ञान व ज्ञानाचा उदय , नव्या विचारांचा प्रारंभ , वैचारिक परंपरा म्हणजे आंबेडकरी विचार अशा शब्दांत सकाळ समूहाचे माजी समूह संपादक, जेष्ठ साहित्यीक, लेखक, पत्रकार उत्तम कांबळे यांनी आपल्या शैलीत म.फुले , डॉ.आंबेडकर उत्सवांचे महत्व स्पष्ट केले.
शहरातील एकात्मता चौकात फुले - शाहू आंबेडकर विचारधारा संवर्धन समितीतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जेष्ठ साहित्यीक उत्तम कांबळे यांचे फु ले - शाहू - आंबेडकरी चळवळ काल , आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते आंबेडकरी विचारधारा व परंपरेचा व फुले - शाहू - कबीर अण्णाभाऊ साठे- रोहिदास महाराज , कबीर , संत तुकाराम आदींच्या कार्याचा उल्लेख करीत व संदर्भ देत आंबेडकरी विचारांचे महत्व आपल्या भाषणांतून स्पष्ट केले. मनुस्मृती जाळा पण ती आधी वाचा , अभ्यास करा असेही कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तरच रूढी परंपरावादी विचारांची जळमटे दूर होतील. मनमाड शहर हे विचारांचे जंक्शन स्थानक आहे . १९३८ मध्ये मनमाडच्या रेल्वे कर्मचाऱ्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी संबोधित केले.भारतीय रेल्वेने खऱ्या अर्थाने दिडशे वर्षांपूर्वी जाती व्यवस्थेवर थप्पड मारली. ज्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे त्यांनी जातपात बाजूला ठेवावी व डब्यात शेजारी शेजारी बसावे अशी वैचारिक क्रांती रेल्वेने घडविली व खऱ्या अर्थाने विकासाचा शुभारंभ केला , जातीव्यवस्था मोडून काढली.असेही कांबळे यांनी स्पष्ट केले. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणां कांबळे यांनी फु ले - शाहू आंबेडकरी चळवळ काल , आज आणि उद्या यातील फरक स्पष्ट करून आगामी काळातील आव्हाने नजरेसमोर आणून दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फुले - शाहू - आंबेडकर विचारधारा समितीचे प्रमुख एस.एम.भाले यांनी तर सूत्रसंचालन नरेश कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगादादा त्रिभूवन होते. यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राजेंद्र आहिरे, मयुर बोरसे , बाबा रणजित सिंगजी , आम्रपाली निकम , मिर्झा बेग , अशोक परदेशी , फिरोज शेख , सिध्दार्थ जोगदंड , प्रदीप गायकवाड , सतिष केदारे,केदारे , प्रविण बागुल , कृष्णा पगारे , प्रा डॉ जे.वाय.इंगळे , प्रविण पगारे आदी उपस्थित होते.
यावेळी मनमाड शहरातील विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यात करंजवन योजनेसाठी सतत पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी, वेटलिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारे प्रवीण व्यवहारे, साहित्यात योगदान देणारे प्रा डॉ जे वाय इंगळे, जयसिंग वाघ, संदीप देशपांडे, नरेश गुजराथी बाबा रणजितसिंगजी आदींचा सत्कार करण्यात आला.




0 टिप्पण्या