इंधन दरवाढीच्या उच्चांक ने खूप धरलाय जोर, रेल्वेचे इंधन चोरीत स्वतः कर्मचारीच झाले चोर
मनमाड : येथून जवळ असलेल्या पानेवाडी इंधन कंपनीच्या भागात रेल्वेच्या इंधन टँकरमधून डिझेल – पेट्रोलची चोरी करून घरी ठेवलेला मुद्देमाल रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने छापा टाकत हस्तगत केला या कारवाईत एका रेल्वे कर्मचाऱ्यासह त्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे
मनमाड शहर हे इंधन कंपन्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे मात्र इंधन कंपन्या असल्यामुळे इंधन चोरीही मोठ्या प्रमाणात होत असते सदर पेट्रोल डीझल हे रेल्वेच्या इंधन वॅगनमधून बाहेर जात असते पानेवाडी येथील कंपनीतून इंधन भरून हे वॅगर बाहेर जात येत असतात डिझेल आणि पेटेल भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे इंधनाने भरलेली रेल्वे वॅगन रिकामी झाल्यानंतर सायडिंगला उभी केल्यानंतर तळाला असलेले रेल्वे वॅगनमधील पेट्रोलआणि डिझेल कॅनमध्ये भरून त्याची चोरी होते. अशी गुप्त माहिती मनमाड रेसूब पथकाला मिळाली आणि पथक वॉच ठेऊन होते. आज सकाळी अशीच गुप्त माहिती मिळाल्यावर पथकाने पानेवाडी येथे धाव घेऊन सापळा रचला या वॅगनमधून तेथील रेल्वे कर्मचारी असलेला विठ्ठल रामचंद्र सांगळे याने सदर वॅगनमधून डिझेल पेट्रोलची चोरी करून हे इंधन आपल्या पानेवाडी येथील आव्हाड वस्ती येथील घरी चोरून ठेवलेले होते सदर गोपनीय माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सदर रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता रेल्वे वॅगनमधून चोरी केलेला पेट्रोल डिझेलचा मुद्देमाल हस्तगत केला यावेळी रेल्वे कर्मचारी विठ्ठल रामचंद्र सांगळे (वय ४५), विजय दशरथ सांगळे (वय २३ दोघे रा. आव्हाड वस्ती, पानेवाडी) या संशयित आरोपी असलेल्या चुलत्या पुतण्याला मुद्देमालासह अटक केली यातील विठ्ठल सांगळे हा रेल्वे कर्मचारी असल्याने मोठी खळबळ उडाली या छाप्यामध्ये नऊ प्लास्टिकच्या कॅन मिळाल्या यात ४ कॅन मध्ये पाच हजार रुपयाचे ५० लिटर डिझेल तर ५ कॅनमध्ये नऊ हजार रुपयाचे ७५ लिटर पेट्रोल असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला दोघांनाही अटक करण्यात आली आहे. रेल्वे मालमत्ता अधिनियमनानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे या रेसुबचे मंडल सुरक्षा शितीज गुरव व सहाय्यक आयुक्त बी.पी. कशुवाह यांच्या नेतृत्वाखाली मनमाड रेसुबचे प्रभारी अधिकारी डि. के. मिश्रा, उपनिरिक्षक आर. एस. यादव, रेसुब कर्मचारी समाधान वाहुळकर, सागर वर्मा, मनिष कुमार, गजानन पाटील, विठ्ठल नागरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या