आमदार अमोल मिटकरींवर गुन्हा दाखल करा; मनमाड परशुराम प्रतिष्ठान संघाची मागणी.


मनमाड  महात्मा गांधी पुतळ्या समोर  येथे श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी शहरातील श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड शहरातील पदाधिकारी व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्या निषेर्धात निवेदन देण्यात आले विवाह सोहळा मधील कन्यादान या हिंदू धर्मीयांच्या पवित्र कार्याची थट्टा उडवली त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावलेल्या  अमोल मिटकरी यांनी पौराहित्य करणाऱ्या पुरोहितांची माफी मागितली पाहिजे ,व यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही फिरकू देणार नाही अशी मागणी  श्री परशुराम प्रतिष्ठान यांनी निवेदनाद्वारे केली आहे, मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी . समीर कुलकर्णी, आशुतोष गाडगीळ, आनंद जोशी, महेश मुळे, हेमंत आडवदकर, प्रसाद दिंडोरकर, जय फुलवाणी, राजेश तिवारी, यांच्या सह मोठ्या संख्येने अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते