मनमाड शहरात भारनियम तात्काळ बंद करावे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांना निवेदन द्वारे मांगणी,
बातमी साठी संपर्क.8888509003.आफरोज अत्तार.



मनमाड: प्रतिनिधी .

मनमाड शहर हे कामगार वस्तीचे शहर असुन नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. मनमाड शहर नुकतेच विज वितरण कंपनी मनमाड कडुन भारनियमनाचे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसा व रात्री उष्मा जाणवतो त्यामुळे भारनियमन झाल्यास समस्यांना सामोरे जावु लागु शकते. करीता सध्या सणासुदीचे दिवस बघता विज वितरण कंपनीकडून भारनियमन केले जावु नये अशी मागणी करीत आहे. 
मागील काही दिवसांपूर्वी देखील मनमाड विज वितरण कार्यालयास भारनियमन करू नये बाबत पत्र दिले होते व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देखिल दिला होता. मात्र विज कंपनीकडून भारनियमनाचे वेळापत्रक प्रसिद्ध केल्याने अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 
मनमाड शहरात भारनियम तात्काळ बंद करावे,ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्ता तनपुरे यांना निवेदन द्वारे मांगणी करण्यात आली आहे, निवेदन देताना स्वर्गीय रफिकभाई शेख मित्र मडंळ मनमाड आदम भाई  शेख, प्रमोद भाऊ जगताप, सदिप भाऊ पाटिल,रविंद्र निकम, मोनिष चाबुकस्वार, बाळासाहेब खरे, सोहेप सैय्यद, बाळा गवळी,हुसैन शेख,आमन शेख, सोनु गवळी, राज फारूकी, अन्नु शेख,तौसिफ पठाण, फरान शेख, किशोर खरात, संदिप पगारे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या सखेंने उपस्थीत होते.