बिरोळे सोसायटीच्या चेअरमन पदी दीपक मोरे ,व्हाईस चेअरमन पदी निंबा शेलार यांची निवड
नांदगाव तालुक्यातील बिरोळे येथील विविध कार्यकारी सेवा संस्था सोसायटीच्या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दीपक मोरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविलेल्या पॅनल ने संपूर्ण 13 जागांवर विजय संपादित केला होता. 22 एप्रिल रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयातील निवडणूक अधिकारी विनायक जाधव यांच्या उपस्थितीत चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची नियुक्ती करण्यात आली.
बिरोळे सोसायटीच्या चेअरमन पदी दीपक मोरे ,व्हाईस चेअरमन पदी निंबा शेलार यांची निवड करण्यात आली.
बिरोळे सोसायटीच्या निवडणुकीत दीपक मोरे निंबा शेलार किरण शेलार जिभाऊ सौंदाणे सरुबाई सौंदाणे नामदेव चव्हाण राजाराम सूर्यवंशी पांडू माळी काळू पवार शिवराम पवार हौसाबाई हिलम निर्मलाबाई नवसारे रामभाऊ शेलार विजयी झाले होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, विलास आहेर,आदी पदाधिकारी व बिरोळे ग्रामस्थ उपस्थित होते,



0 टिप्पण्या