१८५ पेक्षा जास्त कर्मचारी कामावर रूजू झाल्याने मनमाड अगारातून सुटणारी लालपरी आता रस्त्याने धावू लागली आहे.
मनमाड ता २३: येथील मनमाड बस आगारातून जवळपास ८० टक्के बस फेऱ्या नियमीत करण्यात आल्या असून येथून दररोज ५० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. संपामध्ये सहभागी झालेल्या २३६ कर्मचाऱ्यांपैकी १८५ पेक्षा जास्त कर्मचारी कामावर रूजू झाल्याने मनमाड अगारातून सुटणारी लालपरी आता रस्त्याने धावू लागली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी २८ ऑक्टोबर २०२१ पासुन पुकारण्यात आलेल्या संपाची धार उच्च न्यायालयाचा आदेश आणि सिल्वहर ओक प्रकरणानंतर कमी झाली आहे .२२ एप्रिल पर्यंत कामावर या अन्यतः एसटीमहामंडळ कार्यवाही करू शकते. असा निर्णय न्यायालयाने दिला होता. त्यानुसार अनेक कर्मचारी कामावर रुजू झाल्याने मनमाड बस आगाराचे कामकाज वेगाने सुरू झाले . मुख्य म्हणजे सामान्य प्रवाशांची एसटी अर्थात लालपरी धावू लागली आहे. आजमितीस १८७ कर्मचारी कामावर रुजू झाले असून उर्वरित कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यासाठी आपिल केले आहे . हे कर्मचारी देखील लवकरच रूजू होतील. आज पर्यंत ५१ वाहक , ९४ चालक , २३ यांत्रीक आणि १९ प्रशासकीय कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत.त्यामुळे मनमाड बस आगारातून जवळपास दररोज एसटीच्या ५० फेऱ्या सुरू होऊन ८० टक्के डेपोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे एसटी हा प्रवाशाचा आधार असलेल्या सामान्य प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगार संघटनांनी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे , यामागण्यांसाठी संप पुकारला होता . काही कालावधीनंतर हा संप चिघळला शासनाने विलीनीकरणाची मागणी वगळता इतर काही मागण्या मान्य केल्या , पगार वाढ लागू केली परंतू विलीनीकरणाच्या मुद्यावर संपकरी कायम राहिल्याने जवळपास ६ महिन्यांपासून हा संप सुरू होता.दिड महिन्यांपूर्वी काही अंशी एसटी वाहतूक सुरू झाली.पण आता कर्मचारी कामावर परतू लागल्याने एसटीच्या नियोजित फेऱ्या सुरू झाल्या आहेत . त्यामुळे एसटी रस्त्यावर धावू लागली आहे.
मनमाड : एसटी बस सुरू झाल्याने मनमाड बस आगारात दिसू लागलेली प्रवाशांची गर्दी



0 टिप्पण्या