Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात पुणे विद्यापीठ स्थापना दिन साजरा.

मनमाड:-महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयातील क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य डॉ.ए. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 73 वा वर्धापन दिन ज्येष्ठ प्रा. डॉ. विलास थोरात  यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

     याप्रसंगी प्राचार्य डॉ.ए.व्ही पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुणे विद्यापीठ स्थापनेपासून ते आजपर्यंत विद्यापीठाचा लेखाजोखा मांडला व सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या प्रा. डॉ. विलास थोरात यांनी महाविद्यालयात 1991साली राष्ट्रीय छात्र सेना विभागाची स्थापना झाली तेव्हा पासून पुढील सलग 25 वर्ष त्यानी केलेल्या कामाचा अनुभव कथन करुन राष्ट्रीय छात्र सेना विभागातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या  एक छात्र आणि एक छात्रा आशा दोन विद्यार्थ्यांचा दरवर्षी सन्मान व्हावा यासाठी स्मृतिचिन्ह व रोख बक्षिस देण्यासाठी पन्नास हजार रुपये देणगी जाहीर केली.
  याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन करताना कोरोनाविषयक नियमाचे पालन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या