Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नांदगाव तालुक्याच्या वतीने नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा निवेदनाद्वारे जाहीर निषेध करण्यात आले,

नांदगाव.प्रतिनिधी

काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरविला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये केले. जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. हि बाब महाराष्ट्राचा व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. वास्तविक कोरोनाने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेला असतांना नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम घेऊन मोदींनी लाखोंची गर्दी केली, त्या माध्यमातून कोरोना देशात पसरविला. मोदींनी ट्रम्पचा कार्यक्रम घेण्या करिता विमानतळ बंद केले नाही. हवाई वाहतूक सुरु ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविला. देशात कोरोनाचे संकट कायम असतांनाही बिहार राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर देखील पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पौडेचेरी या राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या. त्यामुळे कोरोना पसरविण्याचे खरे पाप नरेंद्र मोदी यांचे च आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन स्वतःचे पाप महाराष्ट्रावर लादण्याचा केविलवाणा प्रयत्न नरेंद्र मोदी यांचेकडून होत आहे.
 महाराष्ट्रातील जनता हे कधीही खपवून घेणार नाही, व सहनहि करणार नाही. महाराष्ट्राची भूमिका नेहमीच दातृत्वाची राहिलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेचा कुठलाही विचार न करता अविवेकी पणाने सरळ लॉकडाऊन लावून देशासमोर मोठे संकट उभे केले. परिणामी मजुरांना व त्यांचावर अवलंबून असलेल्या महिला, लहान मुले व वयोवृद्धांना हजारो किलोमीटर पायी चालत घरी जाण्याची वेळ नरेंद्र मोदी यांच्या अमानवी निर्णयामुळे ओढवली. यात हजारोंना प्राण गमवावे लागले. त्यामुळे वरील वक्तव्याचा नांदगाव तालुका काँग्रेस कमिटी निषेध करत आहे.असे निवेदन नांदगाव तहसीलदार यांना देण्यात आले,ह्या वेळी,समाधान पाटील,सरोजताई शर्मा,अय्युब शेख,प्रशांत शर्मा, मुनावर भाई सुल्तान,हसीना मो शेख,मंगला बुरकुटे,चेतन पाटील,चिंधा बागुल,अनिल पगारे आदी उपस्थीत होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या