कर्नाटक येथील घटनेचा मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने निवेदनद्वारे निषेध व न्यायालयीन चौकशीची मागणी.
मनमाड शहर शिवसेनेतर्फे भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन देण्यात आले त्याद्वारे कर्नाटक राज्यातील पी यु कॉलेज येथे घडलेली घटना निंदनीय असून त्याचा जाहीर निषेध करण्यात आला सध्या हे प्रकरण न्यायालयीन आहे, यावर योग्य तो निर्णय मा. उच्च न्यायालय, कर्नाटक राज्य देतीलच अशी आंम्हाला खात्री आहे, व न्यायालयीन प्रक्रियेवर आमचा विश्वास आहे, आपल्या भारत देशाचे सार्वभौमत्व भारतीय संविधानावर अवलंबून आहे व त्याचे पालन करणे प्रत्येक भारतीयांवर बंधनकारक आहे. या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे या सर्व घटनेमागे एखादे राजकीय, अराजकीय, धार्मिक, सामाजिक असे काही संघटन किंवा व्यक्ती समूह यांचा समावेश आहे का? या संदर्भात चौकशी झाली पाहिजे कारण कु. मुस्कान या विद्यार्थिनीने एका राष्ट्रीय न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले आहे की सदर घटनेच्या दिवशी परिसरातील प्रदर्शनकर्त्यांपैकी 10 टक्केच विद्यार्थी कॉलेजमधील होते तर इतर सर्व बाहेरील व्यक्ती होते, यावरून सिद्ध होते की यात मोठे षडयंत्र आहे, कॉलेज परिसरातील प्रशासन, प्राध्यापक, कर्मचारी, यांच्या जागरूक पणामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. शाळा,कॉलेज, हे शिक्षणाचे पवित्र स्थान आहे व विद्यार्थी हे साधक आहे अशा ठिकाणी जर वाद-विवाद होऊन त्याचे रूपांतर धार्मिक विषमता,हिंसा निर्माण होत असेल तर ही अतिशय चिंताजनक व गंभीर बाब आहे तर सदर प्रकार देशातील एकता व अखंडतेला शोभनीय नाही, तरी या संपूर्ण घटनेवर एक न्यायालयीन चौकशी समिती गठीत करून उपद्रव कर्त्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मांगणीसाठी मनमाड शहर शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या नावानें निवेदन मनमाड शहर सहायक पोलीस निरीक्षक मा. प्रल्हाद गिते साहेब यांना महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ विद्याताई जगताप, सौ नाझमा जाफर मिर्झा यांच्या हस्ते देण्यात आले आहे, या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष। बळीद, युवासेना जिल्हा अधिकारी फरहानदादा खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, युवासेना उपजिल्हा अधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, उपतालुक प्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, कैलाश भाबड, युवासेना शहरप्रमुख आमीन पटेल, नगरसेवक लियाकत शेख, उपजिल्हा संघटक सौ संगीता बागुल उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, लीलाताई राऊत, अन्नपूर्णा अडसुळे, कयाम सैय्यद, शहरसंघटक मुराद शेख, महेंद्र गरुड, वाहतुकसेना शहरप्रमुख अमजद शेख, शिवसेना वैद्यकिय मदत कक्ष तालुका संघटक विकास वाघ, राहील मंसुरी, काशिफ शेख, आयाज शेख, रियाज शेख, रिजवान कुरेशी, ललित रसाळ, कृष्णा जगताप, अब्दुल रउफ शेख आदीं शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या