Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयाच्या  रासेयो स्वयंसेवकांनी शिंगवे येथील दत्त मंदिर टेकडीवर खोदले सीसीटी चर

 महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर  दिनांक ११ फेब्रुवारीपासून शिंगवे याठिकाणी सुरू असून  या शिबिरामध्ये प्राचार्य डॉ.  ए.व्हि. पाटील, उपप्राचार्य डॉ. पी.जी. आंबेकर, पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कुलसचिव श्री.समाधान केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली  रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.पी बी परदेशी,डॉ.गणेश गांगुर्डे व प्रा.वर्षाराणी पेडेकर यांच्या  उपस्थितीत १२५ रासेयो स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी शिंगवे (मतोबा) याठिकाणी गावाच्या शाळेची स्वच्छता, स्मशानभूमीची स्वच्छता, तसेच माझी  वसुंधरा उपक्रमाअंतर्गत जलसंस्काराअंतर्गत   गावाजवळील दत्तमंदिर  टेकडीवर  ६७ C.C.T चर खोदून  समाजोपयोगी काम करण्याचा प्रयत्न करीत आहेत याबद्दल  शिंगवे येथील ग्रामस्थ व गावच्या सरपंच सौ. नीता पाटील यानी स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे तसेच महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या