Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत डस्टबिन वाटप कार्यक्रम.

मनमाड प्रतिनिधी. राजेंद्र धिंगान


आज मनमाड नगरपरिषद मार्फत मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. अजय भन्साळी (सिद्धार्थ हॉस्पिटल) यांच्या सौजन्याने समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील  गोरगरीब भागधारकांना कचरा ठेवण्यासाठी घरगुती डस्टबिन चे वाटप मुख्याधिकारी श्री. डॉ.सचिनकुमार पटेल सर यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याधिकारी सर यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी केले. डॉ.अजय भन्साळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच डॉ. सचिनकुमार पटेल यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. आणि डस्टबिन च वापर हा कचरा ठेवण्यासाठीच करावा, असे आवाहन करण्यात आले. 
मनमाड नगरपरिषद मार्फत मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहरामध्ये चालू असलेल्या कचरा वर्गीकरण जनजागृती अभियान या कार्यक्रमाची माहिती डॉ. अजय भन्साळी यांना देण्यात आली. आपल्या भागामध्ये जनजागृती चे काम सुरू केल्यानंतर तेथे एखादे आरोग्य शिबीर किंवा इतर कार्यक्रम घेण्यास आवश्यक ती मदत करण्याचे आस्वासन डॉक्टर यांनी टीम ला दिले.
सदर कार्यक्रमास नगरपरिषद मधील कार्यालयीन अधिकारी श्री. अशोक पाईक, आरोग्य निरीक्षक विजय सोनवणे, प्रभाग मा. नगरसेवक पिंटू कटारे आणि प्रभागातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल सर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या