Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषद मार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम.


मनमाड प्रतिनिधी. राजेंद्र धिंगान.

आज मनमाड नगरपरिषदमार्फत मा.मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सचिनकुमार पटेल सर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त गुरुद्वारा मुख्य रस्ता या भागामध्ये स्वच्छता मोहिम घेण्यात आली. यामध्ये बाजूचा व इतर परिसर यांची साफसफाई करण्यात आली. 
सदर मोहिमेत नगरपरिषद मधील अधिकारी व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच न. पा सफाई कर्मचारी, घंटागाडी चे हेल्पर व ड्रायव्हर, अर्चना सर्व्हिसेस टीम, आणि सामाजिक कारकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल सर यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या