मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा .
मनमाड येथील कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या डॉक्टरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची परंपरा शाळेने कायम ठेवत यावर्षी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनमाड शहरातील अश्विनी हॉस्पिटलचे प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. संदिप एल. कुलकर्णी व डॉ. सौ. विनिता एस. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच डॉ. सुहास जाधव हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते.
पाहुण्यांचा परिचय शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर यांनी करून दिला तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ भेटवस्तू आणि शाल देवून शाळेच्यावतीने करण्यात आला. याप्रसंगी प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, श्री. धनंजय निंभोरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थित कर्मचारीवृंद आणि निवडक विदयार्थ्यांसमक्ष आपल्या भाषणात प्रमुख पाहुणे डॉ. संदिप कुलकर्णी यांनी आपलं गांव लहान आहे. आपली प्रगती होणार नाही. असा न्युनगंड विदयार्थ्यांनी न बाळगता या शहरातून यशाच्या शिखरावर पोहचलेल्या असंख्य उदाहरणांतून प्रेरणा घ्यावी तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता असते. तिचा शोध घेणे व त्याचा १००% वापर केल्यास यश मिळणं कठीण नाही.
पालकांनी देखील विदयाथ्र्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवितांना त्यांच्या प्रगतीबाबत सतत जागरूक राहावे असे प्रतिपादन केले. आपल्या भाषणात त्यांनी शाळेच्या स्थापनेपासून प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. शाळेची भव्य इमारत, जोपासलेला शैक्षणिक दर्जा व शाळेने शून्यातून केलेली प्रगती ही मनमाडच्या शैक्षणिक इतिहासात अत्यंत मोलाची आहे असे नमूद केले. डॉ. सौ. विनिता कुलकर्णी यांनी शालेय इमारत नैसर्गिक वातावरण व कोरोना काळात शाळेने वापरलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल गौरवोद्गार काढले. डॉ. सुहास जाधव यांनी आपल्या मनोगतातून के.आर.टी. शाळेच्या विदयार्थ्यांची सर्वत्र यशस्वी घोडदौड असते, विदयार्थ्यांच्या अभ्यास व इतर क्षेत्रातील यशासाठी शाळेचे सर्व शिक्षक व प्रशासन अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने काम करीत असतात. याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शाळेतील राष्ट्रीय बालविज्ञान परिषदच्या माध्यमातून राज्यपातळीवर निवड झालेल्या हर्षल देविदास चौधरी, आर्यन नंदकिशोर पगार आणि श्रावणी अमर चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेल्या प्रणव सुहास जाधव, तन्मय सयाजी गायकवाड व ब्राम्ही सयाजी गायकवाड या विदयार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व झेंडागीत शालेय शिक्षकांनी सादर केले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सौ. वैशाली झाल्टे पवार यांनी केले. कार्यक्रम केवळ निमंत्रीतांसाठी असल्याने उर्वरित वर्गाना ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रम दाखविण्यात आला.
आभारप्रदर्शन संस्था व शाळेच्यावतीने प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम्ने करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे श्री. वैभव कुलकर्णी व श्री. धनंजय निंभोरकर यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांचे महत्वाचे व मोलाचे सहकार्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या