Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा...



मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना  चे सर्व शासकीय नियम पाळून व सामाजिक अंतर ठेवून  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करून ध्वजारोहण करण्यात आला.याप्रसंगी एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रकाश बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी  राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. कोरोना महामारी मुळे जास्त गर्दी होऊ नये म्हणून महाविद्यालयाच्या वतीने युट्युब द्वारे कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोरोना नव नवीन रूप धारण करत असून महामारी गेली नाही. त्यामुळे सर्वांनी स्वयम शिस्त पाळून व एक जबाबदार नागरिक म्हणून राहिले पाहिजे असा संदेश दिला. कोरोनाच्या कारणास्तव यावेळी होणारे संचलन व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. शासकीय आदेशानुसार कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पी.जी आंबेकर, श्रीमती ज्योती पालवे, कुलसचिव श्री समाधान केदारे, वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ. एस एस तांबे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. व्ही. आर. फंड, कार्यालयीन अधिक्षक श्री एकनाथ जी आहिरे व 50 टक्के महाविद्यालयीन स्टाफ उपस्थित होते. लाइव्ह प्रक्षेपण द्वारे 327 विद्यार्थी व पालकांनी कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील परिसरात प्राचार्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी कार्यक्रमाधिकारी लेफ्टनंट पी.आर बर्डे यांनी केले तर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन एनएसएस अधिकारी डॉ. पी बी. परदेशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या