Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 थोर स्वातंत्र्य सैनिक, ब्रिटीशांची झोप उडवणाऱ्या टिपू सुलतान विषयी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा जाहीर निषेध !



स्वातंत्र्य सैनिक, इंग्रजांची झोप उडविणाऱ्या तळपत्या तलवारीचा योद्धा, खरा देशप्रेमी, यांच्याबद्दल अतिज्ञानी, इतिहासकार मनुवादी फडणवीस यांनी ‘टिपू सुलतान हिंदूंना त्रास देणारा होता, हिंदू विरोधी होता’ असे वक्तव्य करून एका देशप्रेमी व स्वातंत्र्य सैनिकाचा केवळ तो मुस्लीम होता म्हणून जातीयद्वेषापोटी केलेल्या अपमान जनक विधानाचा एक भारतीय म्हणून मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो. ज्यांचे स्वातंत्र्य प्राप्तीत कुठलेही योगदान नाही, ज्याचे इतिहासाचे ज्ञान तोकडे व मनुवादी झालर असलेले आहे, त्याला एका महान स्वातंत्र्य योद्ध्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला ? टिपू सुलतान यांच्यावर टीका करण्याची उंची फडणवीसांची आहे का ? इंग्रजांची मुखबिरी करणारे मनुवादी आता जातीय द्वेषापोटी एका स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान करत आहेत. महाशय, आपण मोठे जरूर आहात, आपण माजी मुख्यमंत्री आहात पण स्वातंत्र्य सैनिक देशभक्त टिपू सुलतान यांच्या विषयी अनुद्गार काढण्याची आपली लायकी आहे का ? आपले उद्गार म्हणजे एका स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान असून आपण त्वरित जाहीर माफी मागावी. पोकळ देशप्रेमी असल्याचा आव आणून देशाच्या शांततेला व ऐक्याला तडा जाईल असे काहीतरी वक्तव्य करू नका. काहीतरी भडकावू उद्गार काढून देशाच्या ऐक्याला तडा जाईल असे वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणे ही आपल्या मनुवादी दृष्टीने देशसेवा असेल व ज्याने भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला अशा टिपू सुलतान सारख्या स्वातंत्र्य सैनिकाचा केवळ जातीय द्वेषापोटी अपमान करणे हे आपल्या ज्ञानाला, व्यक्तिमत्वाला शोभा देत नाही. आपण स्वत:ला देशप्रेमी म्हणवता आणि दुसरीकडे देशात अशांतता निर्माण होईल असे भडकाऊ वक्तव्य करतात ही ब्रिटीशांची दुहेरी नीती वापरून सत्तेसाठी देशाच्या एकतेला खिळखिळे करू नका व आपण टिपू सुलतान या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल काढलेले अनुद्गार परत घेवून सर्व भारतीयांची जाहीर माफी मागा ! *(डॉ.एस.बी.शाह, NDT न्यूज, शहादा, मो. ९४०५५३९०९१)*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या