Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 महापुरुषांचे पूर्णकृती पुतळ्यांसाठी 
RPI तर्फे एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन,




मनमाड प्रतिनिधी.

मनमाड शहर आंबेडकर चळवळीचा बालेकील्ला म्हणून ओळखला जातो तसेच भुसावळ मंडळातील प्रमुख रेल्वेचे स्टेशन असून याठिकाणी हजारो प्रवासी ये-जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दारा समोरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा असून फार जुना झालेला आहे. पाऊस, वारा, प्रदुषण आदी कारणामुळे पुतळ्याची फिनीशिंग खूपच कमी झालेली असून पुतळ्यास काही प्रमाणात क्रॅचेस व तडे पडलेले आहेत त्यामुळे याठिकाणी शेकडो प्रवासी व येणारे जाणारे नागरीक नतमस्तक होत असतात तेव्हा पुतळ्याची झालेली जीर्णावस्था योग्य दिसत नाही. डॉ बाबा साहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल, 6 डिसेंबर , तसेच बुध्द जयंती,26 जानेवारी प्रजासत्ताक दिन इत्यादी महत्वाच्या दिवशी याठिकाणी हजारो भिमसैनिक नतमस्तक होत असतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा येणाऱ्या जाणाऱ्या हजारो नागरीक व प्रवाशांना स्फुर्तीदेणारा असावा याकरीता सदर पुतळा हा पुर्णाकृती होणे खूपच गरजेचे व आवश्यक आहे.

तसेच छत्रपती शिवाजी चौकातील असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्थाकृती पुतळा हा देखील पुर्णाकृती पुतळा होणे गरजेचे व अत्यावश्यक आहे. याठिकाणी देखील सण, उत्सव, इत्यादी महत्वपूर्ण दिनी मोठ्या संख्येने नागरीक व शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
महात्मा ज्योतीबा फुले चौकात देखील महात्मा ज्योतीबा फुले यांचा फार जुना पुतळा असून येथेही पाऊस, हवा व प्रदुषणामुळे पुतळ्याची निगा राहिलेली नाही. याठिकाणी देखील अनुयायी अभिवादन करीता येत असतात.म्हणून आज मनमाड शहराचा सर्वांगीण झालेला विकास पहाता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले या महापुरुषांचे पुर्णाकृती पुतळे होणे ही आज काळाची गरज बनलेली असून त्यामुळे मनमाड शहराच्या सौंदर्भात भरच पडणार आहे व सर्व मनमाडकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पूर्ण होणार आहे.
नुकतेच मालेगाव शहरामध्ये विश्रामगृह समोरील जागेमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्यास मंजूरी देण्यात आली आहे. या पार्श्वभुमीवर वरील महापुरुषांच्या पुतळ्यांची निर्मिती व्हावी.असे निवेदन आमदार सुहास कांदे यांना देण्यात आले,निवेदना वर गंगादादा त्रिभुवन ,राजाभाऊ अहिरे ,गुरुकुमार निकाळे ,दिलीप नरवडे ,कैलास आहिरे ,संजय भालेराव, महेंद्र बापू वाघ, बाळासाहेब मोरे ,ॲड.प्रमोद अहिरे ,स्वराज देशमुख, सुरेश जगताप ,विलास आहिरे ,सुशिल खरे ,सुरेन्द्र अहिरे ,अशोक आहिरे, बाबा शेख ,पापाशहा, पप्पु दराडे ,धनंजय अवचारे, रामदास निरभवणे ,भिमानंद भीमराव उबाळे, विशाल छाजेड, बाबा शेख,इतर पदाधिकारी कार्यकत्यांचे स्वाक्षऱ्या निवेदन देण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या