Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 नांदगाव तालुक्यात पत्रकारांची भक्कम एकजूट 
विधायक उपक्रम राबविणार; पत्रकार दिनी निर्धार




मनमाड ता ७ : नांदगाव तालुक्यात पत्रकार संघाची भक्कम एकजुट तयार करण्याचा निर्धार व्यक्त करत पत्रकारांपुढील बदलती आव्हाने आणि बदलल्या प्रवाहाला सामोरे जाण्यासाठी पत्रकारांची कार्यशाळा सारखे विविध उपक्रम घेण्याचा मानस पत्रकार दिनानिमित्त येथे झालेल्या हितगुज कार्यक्रमात व्यक्त झाला.
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व नांदगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ६ जानेवारी पत्रकारितेचे आद्य जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन आय.यु.डी.पीतील महात्मा फुले वाचनालयात उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पत्रकार निलेश वाघ होते. नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे, ज्येष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, अशोक परदेशी, सुरेश शेळके, मारूती जगधने, जगन पाटील, बाबासाहेब बोरसे आदींच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जनश्रध्दाच्या संपादिका श्रीमती शकुंतला गुजराथी यांना श्रध्दांजली वाहण्यात  आली. नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघ व नांदगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांचे एकत्रीकरण होऊन यापुढे तालुक्यात पत्रकारांसाठी एकजुटीने विधायक उपक्रमासह विविध प्रश्न आणि समस्यांच्या मागोवा घेण्याचा मनोदय पत्रकारांनी व्यक्त करत या दोन्ही पत्रकार संघटनांच्या एकत्रीकरणाचा उद्देश व कार्याबद्दल तालुका समन्वयक अमोल खरे यांनी आढावा घेतला. पत्रकार सर्वश्री संदीप देशपांडे, सतिष शेकदार, अजय सोनवणे, नरहरी उंबरे, अशोक बिदरी, संजय मोरे,  संदीप जेजूरकर, अनिल आव्हाड, सोमनाथ घोंगाणे, प्रमित आहेर, सुरेश नारायणे, तुषार गोयल, सतिष पुणतांबेकर, शंकर विसपुते, अफरोज अत्तार, योगेश म्हस्के, आनंद बोथरा, निलेश्वर पाटील, विजय भावसार, चंचल गंगवाल, निलेश व्यवहारे, रामदास सोनवणे, निखील मोरे, सोमनाथ तळेकर, बापू मार्केड, ज्ञानेश्वर दुकळे, मिलींद वाघ, विशाल मोरे, राजू लहिरे, राजेंद्र धिंगाण, प्रणव खालकर, अपूर्व दातार आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उपाली परदेशी यांनी तर सूत्रसंचालन सिताराम पिंगळे यांनी केले.




मनमाड : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन साजरा करतांना नांदगाव तालुक्यातील पत्रकार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या